Department
Latest News  • NOT APPLIED FOR ACCREDITATION BY NBA

संस्था स्तरावरील प्रथम व थेट व्दितीय वर्ष प्रवेशासाठी रिक्त जागा उपलब्ध आहेत प्रवेशासाठी आजच संपर्क साधावा

संपर्क नंबर -
प्राचार्य एस पी मोरे - 9421042674
ए बी चौगले - 9420933212

के.पी पाटील पॉलिटेक्निकच्या ३७ विद्यार्थ्यांची नामांकित मल्टिनॅशनल कंपनींमध्ये निवड


के.पी पाटील पॉलिटेक्निकच्या ३७ विद्यार्थ्यांची निवड  बॉश प्रा.ली. चाकण पुणे व डेल्फी प्रा.लि. चाकण पुणे या नामांकित मल्टिनॅशनल कंपनींमध्ये के.पी.पाटील पॉलिटेक्निक कॉलेजच्या विध्यार्थ्यांचा थेट कॅम्पस इन्टरव्ह्यु पार पडला यामध्ये कॉलेजचे अनुक्रमे ३१ व ६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांना बॉश कंपनीतर्फे वार्षिक २ लाख रुपयाचे पकेज ट्रेनिंग कालावधीत मिळणार आहे. तर डेल्फी कंपनीतर्फे वार्षिक १६८०००  रुपयांचे पकेज ट्रेनिंग कालावधीत मिळणार आहे. या प्रसंगी कंपनीचे एच आर प्रतिनिधी श्री मोहन पाटील व रवी पाटील यांनी मुलाखती घेतल्या. या बॉश कंपनीसाठी मेकॅनिकल चे व डेल्फी कंपनी साठी इलेक्ट्रिकल  या विभागाचे उत्तीर्ण विद्यार्थी पात्र होते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विविध पदांवर काम करण्याची सुवर्ण संधी कंपनीमार्फत दिली जाणार आहे. यासाठी टीपीओ प्रमुख एम एम आळवेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील, उपाध्यक्ष एस एस पाटील, सचिव विकास भैय्या पाटील, खजिनदार रणजितसिंह पाटील, प्राचार्य एस पी मोरे आदींनी शुभेच्या दिल्या.   फोटो वर्णन :- निवड झालेल्या विद्यार्थासमवेत बॉशकंपनीचे एच आर प्रतिनिधी मोहन पाटील व रवी पाटील एम एम आळवेकर